Ad will apear here
Next
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीएम चषकाचे उद्घाटन
मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता युवा मोर्चाद्वारे पुणे येथे आयोजित केलेल्या सीएम चषकाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक नोव्हेंबर २०१८ रोजी होणार आहे. हडपसर येथील मगरपट्टा भागातील लक्ष्मी लॉन येथे सायंकाळी चार वाजता हा सोहळा पार पडेल. उद्घाटन कार्यक्रमाच्या स्थळाला अटल खेल नगरी नाव देण्यात आले आहे. हे उद्घाटन ऑलिंपिकइतके भव्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे.

पुण्यात सुरू होणारी ही खेळ व सांस्कृतिक स्पर्धा स्वामी विवेकानंद जयंतीपर्यंत म्हणजेच १२ जानेवारी २०१९पर्यंत चालेल. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील लोकांच्या सक्रिय सहभागामुळे या स्पर्धेत ५० लाख स्पर्धक सहभाग घेतील. या वेळी महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा व भव्यतेची झलक बघायला मिळणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रीडा जगतातील विशेष व्यक्ती, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू, युवा खेळाडू, पुण्यातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

ज्यांचा खेळाशी कमी संबंध येतो अशा युवकांना व लोकांना क्रीडा मैदानांसोबत जोडणे हे या चषकाच्या आयोजनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या स्पर्धेला यशस्वी करण्याची जबाबदारी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, पक्ष पदाधिकारी व सर्व महत्त्वपूर्ण पदांवरील व्यक्ती, कार्यकर्ते यांनी घेतली आहे. एकूण ५० लाख स्पर्धक सहभागी होणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, स्पोर्ट्स क्लब व युवा मंडळांना जोडण्यात येत आहे. ‘सीएम चषका’मध्ये भाग घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, क्रीडा मंत्री विनोद तावडे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, ‘भाजयुमो’च्या राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजन, युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांसह खासदार, आमदार व भाजप नेते उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटनाविषयी :
दिवस :
एक नोव्हेंबर २०१८
वेळ : सायंकाळी चार वाजता
स्थळ : लक्ष्मी लॉन, मगरपट्टा, हडपसर, पुणे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZJOBT
Similar Posts
‘संवाद आणि सूक्ष्म नियोजनावर अधिक भर द्यावा’ मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी येणार्‍या काळात संवाद आणि सूक्ष्म नियोजनावर अधिक भर दिला पाहिजे,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत केले.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी शासकीय जमीन देण्यास मंजुरी मुंबई : मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी बालेवाडी (ता. हवेली) येथील पाच हेक्टर ६० आर इतकी शासकीय जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या कामास गती मिळून शहरातील वाहतूकीची समस्या दूर होणार आहे. यासाठी पुणे शहरातील
भाजपच्या प्रत्येक जिल्हा शाखेतर्फे दुष्काळग्रस्त भागात सेवाकार्य मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सर्व लोकप्रतिनिधी राज्यातील दुष्काळ असलेल्या जिल्ह्यांतील चारा छावण्यांना भेट देतील आणि ‘भाजप’ची प्रत्येक जिल्हा शाखा दुष्काळग्रस्त भागात सेवाकार्य करेल, असा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आ
शाह यांची टाटा व माधुरी दीक्षित यांच्याशी भेट मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सहा जून रोजी मुंबईत प्रख्यात उद्योगपती रतन टाटा व चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची सदिच्छा भेट घेतली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language